विश्वभारती कला क्रीडा संघटनेच्या माध्यमातून ठेवण्यात येणाऱ्या मॅरेथॉन बद्दल दिनांक 28- 4 -2023 रोजी हनुमान मंदिर खानापूर येथे मीटिंग भरवण्यात आली होती या ठिकाणी झालेल्या चर्चेत येणाऱ्या ४ जून रोजी होणाऱ्या मॅरेथॉन बद्दल चर्चा करण्यात आली , कारगिल येथील जवानांना श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने व माजी सैनिकांच्या आग्रहाखातील या स्पर्धेचे आयोजन केले आहे. पुणे येथील शरहरद फाउंडेशन या संस्थेमार्फत दरवर्षी 16 सप्टेंबरला गेली पाच वर्ष ही स्पर्धा आयोजित केली जाते आणि त्यांच्या प्रेरणेने ही स्पर्धा विश्वभारती कला क्रीडा संघटनेने आयोजित केली आहे.

या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना कारगिल येथील 16 सप्टेंबर 2023 या कारगिल मॅरेथॉन मध्ये सहभाग होण्याची संधी मिळणार आहे. ही स्पर्धा 4 जून 23 रोजी बेळगाव येथे पहिल्यांदाच आयोजित केली आहे. या सर्व विजयी उमेदवारांना आकर्षक बक्षिसे व त्यांना कोचिंग मिळण्याची संधी संघटनेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे्.
तरी या संधीचा सर्व खेळाडूंनी उपयोग करून घ्यावा ही विनंती आहे.
स्पर्धेचे अटी व नियम.
1) फुल मॅरेथॉन /42.195 किलोमीटर अंतराची असेल
खुल्या गटासाठी वयोमर्यादा 18 वर्षावरीलत प्रवेश फी प्रत्येकी 700 रुपये
2) हाफ मॅरेथॉन 21 किलोमीटर अंतराची असेल
पुरुष व महिला गट 18 वर्षांवरील
प्रवेश फी 600 रुपये
3) दहा किलोमीटर पुरुष व महिला गटासाठी 18 वर्षावरील
प्रवेश फी 500 रुपये
4) दहा किलोमीटर अंतर पुरुष व महिला गट वयोमर्यादा 35 वर्षावरील प्रवेश फी 500 रुपये
5) ड्रीम मॅरेथॉन सर्वांसाठी खुली
स्पर्धा प्रवेश फी 300 रुपये
स्पर्धकासाठी प्रवेश प्रक्रिया
1. मेडिकल सर्टिफिकेट आवश्यक
2. आधार कार्ड आवश्यक
3. डिजिटल पेमेंट ची सुविधा

Contact For More Information – 9591451091

Previous articleनिर्माता राजू भारती की हिंदी फ़िल्म ‘बेरा एक अघोरी’ को 300 सिनेमाघरों में मिली शानदार ओपनिंग
Next articleमहाराष्ट्र में लोकतंत्र निशाने पर है: आदित्य ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here